अथणी तालुक्यातील कोहळ्ळी गावात जंगली गव्याच्या वावराने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोहल्ली गावात, जंगली गव्याचे आगमन झाले असून तो समोर येणाऱ्यांवर हल्ला करतो. गव्याला पकडण्यासाठी गावातील शेतकरी व अथणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
या मोहिमेदरम्यान दत्तू कांदे नावाच्या शेतकऱ्यावर हल्ला करून गव्याने त्याला जखमी केले.जखमीला उपचारासाठी ऐगळी गावच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार प्रभावी ठरले असून शेतकऱ्याची प्रकृती बरी झाली आहे. पहाटे गव्याला पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतात हिंडून विविध पिकांची त्याने नासाडी केली आहे .


Recent Comments