बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या वैद्यकीय अनुदान, प्रसूती सुविधा व विवाह अनुदान आदी सुविधांबाबत जागृती करण्यासाठी बेळगावात आज जथा काढण्यात आला. दिवाणी न्यायाधीश पी. मुरली मोहन रेड्डी यांनी त्याला चालना दिली.
राज्य सरकारच्या वतीने नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना पेन्शन सुविधा, कुटुंब निवृत्ती वेतन सुविधा, वैद्यकीय अनुदान, मातृत्व सुविधा आणि विवाह अनुदान यासारख्या मिळणाऱ्या सुविधांसाठी बेळगावात आज जथा काढण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगावचे दिवाणी न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी यांनी हिरवे निशाण दाखवून केले.

यावेळी दिवाणी न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी म्हणाले की, बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बेळगावचे कामगार उपायुक्त नागेश डी.जी., बेळगाव विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त एम. बी. अन्सारी, कामगार अधिकारी मल्लिकार्जुन जोगुर आदी अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments