Belagavi

बेळगावात एका तोतया पत्रकारावर गुन्हा

Share

एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगत फिरणाऱ्या एका तोतया पत्रकारावर बेळगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख गावचा रहिवासी असलेल्या ४० वर्षीय रमजान सुभान मुजावर असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. रमजान हा एका शानदार कारमधून बेळगावातील कन्नड साहित्य भवनाच्या आवारात आला होता. त्याच्या कारवर दर्शनी भागात एका मोठ्या टीव्ही चॅनेलचा लोगो व त्याखाली एमडी असे लिहिले होते.

त्यावेळी त्याच चॅनेलच्या स्थानिक पत्रकाराने रमजानची चौकशी केली असता, त्याने आपण एका प्रख्यात मराठी चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगितले. त्यावर त्याच्याकडे ओळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यास सांगून त्याची तपासणी केली असता, दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे दिसून आले.

त्यावरून रमजान मुजावर हा तोतया पत्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर मार्केट पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर मार्केट पोलिसांनी त्याची कार जप्त करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

Tags: