Belagavi

कलाश्री बंब अँड स्टील फर्निचरतर्फे मंगळवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Share

बेळगाव येथील कलाश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर व विजया, दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 20) रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. ही माहिती कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी दिली.

या शिबिरात विजया दक्षता हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबीर सकाळी 11 ते 4 या वेळेत उद्यमबाग येथील कलाश्री टॉवरच्या सभागृहात होणार असून या शिबिरात रक्तदाब,(b p )मधुमेह, (शुगर)हाडांची ठिसूळता तसेच अन्य विविध

आजार व त्याबाबतचे मार्गदर्शन मोफत करण्यात येणार आहे. तसेच गरजूंना मोफत औषध ही वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मोतीबिंदूचे ऑपरेशनची शक्यता तपासून मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन विजया ऑर्थो सेंटरचे प्रमुख डॉ. रवी पाटील, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश नाईक, कलाश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश डोळेकर उपस्थित राहणार आहेत.

Tags: