अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
बेळगावातील गोवावेस येथून आज, रविवारी सकाळी संमेलनस्थळ मराठा मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली. सजवलेल्या अश्वावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि बालशिवराय तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील रसिक या ग्रंथदिंडीचे अग्रभागी होते. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी असलेली पालखी होती.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा देत ग्रंथदिंडी काढण्यात आली. फ्लो
भगवे फेटे व पांढरेशुभ्र पोशाख परिधान करून पुरुष तर पारंपरिक नऊवारी कासोटा घालून महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

यावेळी इन न्यूजशी बोलताना आयोजकांनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तमाम बेळगावकर मराठी साहित्यप्रेमी रसिकांच्या सहयोगाने बेळगावात आज पाचवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीत भरविण्यात आले आहे. साहित्यरसिकांसाठी ही एक मोठी मेजवानी आहे. सर्व मराठीसाहित्यप्रेमी आणि मराठी भाषिकांनी यात सहभागी होऊन साहित्य संमेलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments