Belagavi

सामाजिक कार्यकर्त्यांनी एका असहाय्य मातेला केली मदत : मृत मुलावर केले अंत्यसंस्कार

Share

एका असहाय्य मातेला तिच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करून सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे .

जन्म दिलेल्या मुलाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे किंवा नातेवाईक नसताना एका गरीब आईने रुग्णालयात धाव घेत अखेर डॉक्टरांना पत्र लिहून अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली, अशी हृदयस्पर्शी घटना आज बेळगाव शहरात घडली.

, बेळगावात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील निलव्वा नावाच्या महिलेने 15 दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या आजारपणामुळे बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र शुक्रवारी अचानक मुलाचा मृत्यू झाला. निलव्वा यांच्याकडे नातेवाईक नसल्यामुळे आणि मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे एके दिवशी त्यांच्या मृत मुलाचा मृतदेह बिम्स हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला. नंतर आईने वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून माझ्या मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. यावेळी डॉक्टरांनी सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली .

अॅलन विजय मोरे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी सदाशिव नगर स्मशानात अंत्यसंस्कार केले .

यावेळी मृतांची आईने नीलव्वा हिने , या कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले कि , मुलाच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे निराधार झाली आहे . सरकारकडून मिळणाऱ्या दोन हजार रुपयांमद्ये आम्ही आपला उदरनिर्वाह चालवत होतो . मात्र देवाने मुलाला हिरावून नेले . आता कोणाच्या आधारावर जगू

अॅलन मोरे यांनी सांगितले कि आम्ही मृतावर हिंदू धर्माच्या विधीनुसार अंत्यसंस्कार केले आहे . आम्ही याना बसस्टॅंडपर्यंत सोडतो . त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना आश्रमात घेऊन जातो .

गरिबीमुळे एका मातेवर ओढवलेल्या प्रसंगाला धावून जात , सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे

Tags: