कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्व सूचना न देता गाई -म्हशीच्या दूध दरात कपात केल्यामुळे सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हापूर प्रमाणे दर वाढवून मिळावा अशी मागणी करत गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांना संघाच्या कार्यालयात डांबून बाहेरून टाळे ठोकल्याची घटना अलतगा (ता. जि. बेळगाव) येथे आज शुक्रवारी दुपारी घडली.
सीमाभागातील बेळगाव व खानापूर तालुक्यातून दररोज एकूण सुमारे 40,000 लिटर दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध केंद्राच्या ठिकाणी जाते. या पद्धतीने सीमाभागातील दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या गोकुळ दूध संघाने अलीकडेच दूध उत्पादकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते.
मात्र गेल्या 1 फेब्रुवारी 2024 पासून गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर 4.50 रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी अलतगा येथील गोकुळच्या श्री ब्रह्मलिंग दूध उत्पादक संघाच्या शाखेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून शाखेला घेराव घातला.


Recent Comments