बेळगावकरांचे आर्थिक जीवन सुसह्य व समृद्ध करण्यासाठी “मलबेरी फिनसर्व्ह” हे नवे आर्थिक-गुंतवणूक सल्लागार दालन आजपासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाले आहे.
होय, बेळगाव शहराची वाटचाल आता महानगराकडे होत आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीसह रोजगार-व्यवसायासाठी शहरात येणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्याबरोबर बेळगावकरांचा कल आता आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीचे सुयोग्य मार्गदर्शन करणाऱ्या सल्लागारांची गरजही वाढत आहे. नेमकी हीच बाब हेरून आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक मार्गदर्शनाचा प्रचंड अनुभव असणाऱ्या सिद्धू दोडलिंगन्नावर यांनी “मलबेरी फिनसर्व्ह” नामक गुंतवणूक सल्ला केंद्राची स्थापना केली आहे. गोवावेसजवळील मराठा मंदिर कॉम्प्लेक्स येथे गाळा क्र. ५ येथे असलेल्या या “मलबेरी फिनसर्व्ह”चा शानदार उदघाटन सोहळा आज शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी दोड्डन्नावर शुगर्सचे माजी सीईओ यु. आर. के. राव यांच्याहस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून “मलबेरी फिनसर्व्ह”चे उदघाटन करण्यात आले.
यावेळी “मलबेरी फिनसर्व्ह”ला शुभेच्छा देताना यु. आर. के. राव म्हणाले की, सिद्धू दोडलिंगन्नावर यांना आर्थिक गुंतवणूक क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. आयसीआयसीआय बँकेच्या म्युच्युअल फंडापासून अनेक कंपन्यांचे म्युच्युअल फंड, आरोग्य व अन्य विविध प्रकारचे इन्शुरन्स आणि फायनान्शिअल प्रॉडक्ट्स वितरणाचा चांगला अनुभव त्यांना आहे. त्यांच्या या संस्थेची लवकरात लवकर भरभराट होवो आणि व्यवसायाचा विस्तार व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांत प्रमुख किरण गावडे म्हणजे की, सिद्दू यांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत मृदुभाषी आणि उत्साही आहेत. एक लाख ग्राहकांपर्यंत पोहोचायचे त्यांचे उद्दिष्ट आहे, त्यांनी एक कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचावे आणि व्यवसायात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा त्याची दिल्या.
निपाणीच्या संकपाळे इन्वेस्ट्मेन्ट्स सर्व्हिसचे संचालक चंद्रकांत संकपाळे म्हणाले की, आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य सल्लागार महत्वाचा असतो. अनेक कंपन्या या क्षेत्रात येतात, ग्राहकांना मोठमोठी आमिषे दाखवून पैसे गुतवण्यास भाग पाडून नंतर लुबाडून गाशा गुंडाळतात. त्यामुळे पारदर्शी व्यवहार ठेवून सुयोग्य मार्गदर्शन करणाऱ्या संस्था ग्राहकांनी निवडणे गरजेचे असते. “मलबेरी फिनसर्व्ह”मध्ये अशाचप्रकारे ग्राहकांची काळजी घेत आर्थिक मार्गदर्शन करून सल्ला देण्यात येतो. सिदू यांना या क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ग्राहकांनी येथे येऊन त्यांच्या पैशांच्या योग्य गुंतवणुकीचा सल्ला प्राप्त करावा असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ग्राहक दयानंद आस्कि यांनी सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक जीवनशैली आणि आर्थिक जीवनशैली अशा दोन जीवनशैली असतात. आर्थिक जीवनशैली चांगली असेल तर वैयक्तिक जीवनशैली चांगली राहते. आर्थिक जीवनशैली चांगली राहण्यासाठी योग्य गुंतवणूक सल्लागार असणे गरजेचे असते. “मलबेरी फिनसर्व्ह”चे प्रमोटर सिद्दू हे असेच एक चांगले गुंतवणूक सल्लागार आहेत. मला आर्थिक जीवनशैली सुधारण्यासाठी त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मी आज आर्थिक सुस्थितीत आहे. त्यांच्या या नव्या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
यावेळी “मलबेरी फिनसर्व्ह”चे प्रमोटर सिद्दू दोडलिंगन्नावर यांनी स्वागत करून सांगितले की, गेल्या दीड वर्षांत बेळगावातील ६०० कुटुंबांशी आम्ही जोडले गेलो आहोत अन भविष्यात एक लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. यावेळी अनेक ग्राहक, हितचिंतक आणि निमंत्रित उपस्थित होते.


Recent Comments