बेळगावातील जिजाऊ ब्रिगेड-राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. इंद्रप्रस्थ नगरातील संत तुकाराम सभागृहात जिजाऊ ब्रिगेड-राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दीपप्रज्वलन व स्वागत गीतानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रमुख वक्त्या म्हणून सौ. सुनीता पाटणकर यांनी राजमाता जिजाऊंबद्दलचे अभ्यासपूर्ण विचार मांडले. अन्य एक वक्त्या सौ. मनिषा नेसरकर यांनी ‘समाजातील महिलांची स्थिती व कर्तव्य’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापक डॉ.सोनाली सरनोबत यांनी स्वागत केले. 2000 मध्ये, त्यांनी राजमाता जिजाऊ कल्चरल फाऊंडेशनची स्थापना आणि नोंदणी केली, परंतु ते प्रत्यक्षात येण्यासाठी बराच वेळ लागला. हे राजकीय व्यासपीठ नसून, आमचा भर समाज कल्याण आणि संस्कृती संवर्धनावर आहे. महिलांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात शाखा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

सध्या बेळगाव जिल्ह्यात पाच अध्यक्ष आहेत. सौ. कांचन चौगुले, सौ. गीतांजली चौगुले, सौ. नम्रता हुंदरे, सौ. आशाराणी निंबाळकर, श्रीमती. नीना काकतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव म्हणून सौ. मंगल पाटील, सौ. निशिता कदम, सौ. चंद्रा चोप्रा, सौ.लक्ष्मी गौडाडकर काम पाहणार आहेत. दीपाली माळकरी, स्वाती फडके व वृषाली मोरे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री.किशोर काकडे यांनी दिलखुलास निवेदन करून कार्यक्रमात रंगत आणली. शेवटी तिळगुळ घेऊन हळदीकुंकूचा कार्यक्रम पार पडला. सुमारे तीनशे महिलांनी सहभाग घेतला.


Recent Comments