Belagavi

महापौर-उपमहापौर, गटनेत्यांचा बेळगाव भाजपतर्फे सत्कार

Share

बेळगावच्या नूतन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सत्तारूढ गटनेते गिरीश धोंगडी यांचा बेळगाव महानगर भाजपतर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

बेळगावातील भाजप महानगर जिल्हा कार्यालयात बेळगावच्या नूतन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सत्तारूढ गटनेते गिरीश धोंगडी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार व अन्य मान्यवरांच्या हस्ते नूतन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सत्तारूढ गटनेते गिरीश धोंगडी यांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सत्तारूढ गटनेते गिरीश धोंगडी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सामन्यातील सामान्य एकनिष्ठ कार्यकर्त्याला पद, प्रतिष्ठा मिळवून देणारा पक्ष आहे. याचे उदाहरण म्हणजे आमची निवड होय. मीसुद्धा गेली वीस वर्षे पक्षासाठी, दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहून कार्य केले. त्यामुळे मला मंडळ अध्यक्ष, महानगर सचिव, सरकारनियुक्त नगरसेवक अशी पदे पक्षाने व आमदार अभय पाटील यांनी दिली.

नंतर महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्यावर निवडून येऊन मी नगरसेवक झालो. आज मला सत्तारूढ गटनेतेपद देण्यात आले आहे. माझ्याचप्रमाणे गीता सुतार यांनीही मंडळ अध्यक्षपासून विविध पदांवर काम करून आज त्या महानगर जिल्हाध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे एकनिष्ठ राहून पक्षाचे कार्य केल्यास, भाजपमध्ये निश्चित चांगले स्थानमान, प्रतिष्ठा मिळते हे लक्षात घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात माजी सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी, विजय कोडगनूर, शिल्पा केकरे, माध्यम संयोजक शरद पाटील, नगरसेवक-नगरसेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: