Hukkeri

जागा पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हिडकल धरणग्रस्तांनी घेतले फैलावर

Share

हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी गावातील हिडकल धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांच्या ३९४ एकर व २० गुंठे जमिनीचा ५० वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आर.व्ही. तल्लुर आणि एस एम महडीवाले, मास्तीहोळी गावात पाहणीसाठी आले

त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला . गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकारी जागेची पाहणी करण्यात वेळ घालवून शेतकऱ्यांची फसवणूक करत असून, केवळ आश्वासने दिली असल्याचा आरोप शेतकरी महिलांनी केला आहे.

‘तुम्ही आता आमची भरपाई द्या नाहीतर आम्ही तुमच्यासमोर विष पिऊन मरू, नाहीतर हिडकल धरण फोडू’, असे संतप्त महिलांनी सांगितले.
2020 – 2021 मध्ये. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची अधिकाऱ्यांनी फेरतपासणी केली.
उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांना घाम फोडला.

28 फेब्रुवारीपर्यंत तुमची समस्या सोडवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. 28 फेब्रुवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर विष प्राशन करून आमरण उपोषण करू, असे शेतकरी बाळेश मावनुरी यांनी सांगितले.

यावेळी शांतव्वा गस्ती, कमलव्वा इरगर, इरव्वा मिंद्रोली, शिवलीला गुरव, भरमा कमती , निंगाण्णा मावनुरी, निंगाप्पा गोणी यांच्यासह गावातील नेते उपस्थित होते.

Tags: