बेळगाव हा भावनिक जिल्हा आहे. त्यामुळे सरकारने विचार करून जिल्ह्याचे विभाजन करावे अशी मागणी कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली.
बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना बसव जय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करू नये असे मला वाटते. कारण बेळगाव हा भावनिक जिल्हा आहे. सरकारने विचार करून कन्नड समर्थक, संघटना, साहित्यिक यांना बोलावून त्यांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, पंचमसाली समाज जिल्हाध्यक्ष आर. के. पाटील, शिवानंद, गुंडू पाटील उपस्थित होते.


Recent Comments