पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना बेळगावात काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आणि माजी सैनिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पुलवामा हल्ल्याला काल ५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातील राणी चेन्नम्मा सर्कल येथे बुधवारी सायंकाळी मेणबत्त्या पेटवून मौन पाळून शहिदांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
काँग्रेस कार्यकर्त्या आयेशा सनदी म्हणाल्या की, पुलवामा हल्ला ही भारतातील सर्वात घृणास्पद घटना होती. असा हल्ला रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, केंद्र सरकारने पुलवामा हल्ल्याचे नेमके सत्य देशातील जनतेला सांगावे.
एका माजी सैनिकाने सांगितले की, पुलवामा हल्ला ही सर्वात भयंकर घटना आहे. असे हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरले असून केंद्र सरकारने सैनिकांची काळजी घ्यावी, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, माजी सैनिक संघटनेचे सदस्य आदी उपस्थित होते.


Recent Comments