बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावची श्री महालक्ष्मी यात्रा १७ एप्रिलपासून करण्याचा संकल्प झाला आहे. त्यामुळे गावकरी जोरदार तयारीला लागले आहेत.
तब्बल ३० वर्षानंतर सदर यात्रा होणार असून गुरुवार दि. १५ रोजी महालक्ष्मी देवीचा चौथरा बांधण्याची सुरुवात झाली आहे. त्यानंतर धार्मिक विधी करून मराठी शाळेच्या पटांगणात देवीची आसन व्यवस्था (गदग) बांधण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. परंपरेनुसार शाळेच्या, गावच्या वेशीत वडाच्या झाडाच्या नजिक चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यासमोर भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. शिवाय पटांगण खूप मोठे असल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचे ग्रामस्थानी सांगितले.

गुरुवारी पटांगण परिसरात सकाळपासूनच ग्रामस्थ मंडळ, गावकरी जमू लागले होते. त्यानंतर चौथऱ्यासाठी पूर्ण आराखडा तयार करण्यासाठी काही ठिकाणी बांधलेल्या चौथऱ्याची पाहणी करण्यात आली. 70 फुटाचा भव्य रथ या यात्रेचे आकर्षण ठरणार आहे. येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात यात्रा होणार आहे. ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत. यावेळी अध्यक्ष वसंत अष्टेकर, विष्णु मोरे, मारूती जाधव, श्रीरंग भास्कळ, कल्लाप्पा अष्टेकर, कृष्णा जाधव, ग्राम पंचायत सदस्य संदीप अष्टेकर, बबलू नावगेकर, परशराम भास्कळ, नारायन भास्कळ, यशवंत जाधव, बंडू भास्कळ, अब्दुल नावगेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments