राज्यात काँग्रेसचे सरकार येऊन नऊ महिने उलटले तरी बेळगाव महापालिकेला विशेष अनुदान दिले नसल्याबद्दल आमदार अभय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
बेळगावात आज महापौर-उपमहापौर निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलताना होते. अनुदानासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे सरकार येऊन 9 महिने उलटले तरी बेळगावसह राज्यातील एकही महापालिकेला विशेष अनुदान देण्यात आलेले नाही. भाजप सरकारच्या काळात महापालिकेला दरवर्षी 125 कोटी रुपये विशेष अनुदान दिले होते. पण काँग्रेस सरकारने 125 रुपयेही दिलेले नाहीत. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला काँग्रेसने अनुदान दिले असून प्रत्यक्षात काहीच झाले नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली.


Recent Comments