Hukkeri

हिरण्यकेशी नदीचे पाणी सोडा अन्यथा करणार आंदोलन : रामचंद्र जोशी

Share

हिरण्यकेशी नदीतून कोचरी, बडकुंद्री, यरगट्टी, येरनाळ आणि सुलतानपूर बॅरेजेसमध्ये पाणी सोडा अन्यथा 19 फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा हुक्केरी तालुका शेतकरी हितरक्षण वेदिकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट रामचंद्र जोशी यांनी कर्नाटक पाटबंधारे विभागाला दिला आहे.

हुक्केरी प्रवासी मंदिर येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जोशी म्हणाले की, हिरण्यकेशी नदीवरील विविध गावांच्या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी व गुरांना पिण्याच्या पाण्याची अडचण होत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी न सोडल्यास येत्या 19 फेब्रुवारी रोजी दहा गावांतील शेतकऱ्यांसह बडकुंद्री क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग बंद करून आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी शेतकरी हितरक्षण वेदिकेचे नेते हणमंत इनामदार, तम्मनगौडा पाटील, बसगौडा देसाई, काडप्पा मगदुम, प्रभूगौडा पाटील, शंकर कुडनुरी, आनंद चौगला, अनिरुद्ध जोशी, शंकर सावळगी आदी उपस्थित होते.

Tags: