हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात वकील सागर पांडुरंग माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात बेळगावात वकील संघटनेने आंदोलन केले.
संकेश्वर शहरातील वकील सागर पांडुरंग माने यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या विरोधात बेळगावात वकील संघटनेने न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन केले व हल्लेखोरांच्या अटकेची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

वकिलांच्या आंदोलनाबाबत बोलणाऱ्या बेळगावी बार असोसिएशनचे सदस्यांनी सांगितले की, ऍडव्होकेट सागर पांडुरंग माने यांच्यावर संकेश्वर शहरात जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी केवळ दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करावी.


Recent Comments