माघ मासातील पंचमीनिमित्त बेळगावातील भडकल गल्लीतील देवांग हाटकर समाजाच्या श्री बनशंकरी मंदिरात आज देवीच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा करण्यात आला.
बेळगावातील भडकल गल्लीतील देवांग हाटकर समाजाच्या श्री बनशंकरी मंदिरात आज देवीच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी देवीची विशेष पूजा करून कुंकुमार्चन केले. यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना श्री बनशंकरी मंदिराचे ट्रस्टी रमाकांत सुलधाळ म्हणाले की, भडकल गल्लीतील श्री बनशंकरी मंदिर हे देवांग हाटकर समाजाचे श्रद्धास्थान असून, आज माघ मासातील पंचमीनिमित्त देवीच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

यानिमित्त देवीच्या मुर्तीला महाअभिषेक, कुंकुमार्चन, श्रीचक्र पूजा आदी धार्मिक विधी करण्यात आले. येत्या २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत देवीचा वार्षिक जत्रा महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त दररोज सायंकाळी देवीची महामंगलारती, दुर्गा सप्तशती पठण, नवचंडी होम, पालखी उत्सव आणि २४ रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांनी व देवांग हाटकर समाजाच्या बंधुभगिनींनी मोठ्या प्रमाणात या जत्रा महोत्सवात सहभागी होऊन देवीचा कृपाशिर्वाद प्राप्त करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बनशंकरी मंदिर समितीचे व देवांग हाटकर समाजाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Recent Comments