कलघटगी तालुक्यातील माचापूर गावाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर विद्युत खांबाला धडकल्याने भीषण अपघात झाला.
मुंदगोड-कलघटगी राज्य महामार्गावर उसाने भरलेला व कलघटगीकडे जात असताना समोरून येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला वाट देण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर विजेच्या खांबाला धडकला. त्यामुळे विद्युत खांब मोडून जमिनदोस्त झाला. सुदैवानेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेस्कॉम विभागाने तातडीने वीजप्रवाह बंद केला. या अपघातामुळे वाहनांची वाहतूक खोळंबली होती.


Recent Comments