कॉलेज विध्यार्थी-बसचालकात बसस्थानकातच जुंपल्याची घटना अळणावर
शहरातील बसस्थानकावर घडली. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बस चालकाची कॉलर पकडून सर्वांसमोर त्याला जाब विचारला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बस चालकाची कॉलर पकडून हाणामारी करण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्याने खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता बस चालकाने विद्यार्थ्याला मारहाण करून पोलिस ठाण्यात नेले. याचा राग मनात धरून विद्यार्थ्याने आज बस चालकाशी बाचाबाची केली. ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला ओढले. यावेळी दोघांत बराच काळ वादावादी झाली. अखेर स्थानिकांनी भांडण मिटवले आहे.
बस चालक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात झालेल्या भांडणाचे प्रकरण आता अळणावर पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.


Recent Comments