Dharwad

नरेंद्र येथे होणार प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धा : अमृत देसाई

Share

खासदार क्रीडा महोत्सवाचा एक भाग म्हणून धारवाड ग्रामीण मतदारसंघातील नरेंद्र गावात 20 व 21 फेब्रुवारी रोजी प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे माजी आमदार अमृत देसाई यांनी सांगितले.

धारवाड येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अमृत देसाई म्हणाले की, नरेंद्र गावातील कुंभापूर तलावाजवळ तिर्लापुरा येथे कबड्डी स्पर्धा होणार आहेत. मॅटवर कबड्डी खेळवली जाणार आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात यापूर्वी कबड्डी स्पर्धा झाल्या आहेत. आता धारवाड ग्रामीण मतदारसंघात कबड्डी स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 40 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 20 हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 10 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: