Belagavi

बेळगाव वकिल संघटनेच्या नवनियुक्त संचालकांकडून गणेशपूजा

Share

बेळगाव वकिल संघटनेच्या नवनियुक्त संचालकांनी अध्यक्ष एस. एस. किवडसन्नावर यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात आज विशेष पूजा केली.

बेळगाव वकील संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एस. एस. किवडसन्नावर हे सहाव्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानिमित्त आज सर्व नवनियुक्त संचालकांनी बेळगावातील चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात जाऊन सामूहिक पूजा केली.

यावेळी इन न्यूजशी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष एस. एस. किवडसन्नावर म्हणाले की, बेळगाव वकील संघटनेच्या अध्यक्षपदी मला सर्व सदस्यांनी सहाव्यांदा निवडून दिले आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आमच्या कार्यकाळात कसलेही विघ्न येऊ नये म्हणून आज आम्ही श्री गणेशाची सामूहिक पूजा केली आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बेळगावातील वकिलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदारांना भेटून वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची शपथ श्री गणेशाला साक्षी ठेवून घेतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ऍड. दिनेश पाटील म्हणाले की, बेळगाव वकील संघटनेला स्वतःचा असा एक चांगला इतिहास आहे. केवळ कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशातच या संघटनेचे नाव आहे. हा गौरव आणखी वाढावा यासाठी नव्या कार्यकारिणीने प्रयत्न करावेत असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष एस एस किवडसन्नावर, उपाध्यक्ष विजय पाटील, बसवराज मुगळी आणि शीतल रामशेट्टी, सरचिटणीस यल्लप्पा दिवटे, सहसचिव विश्वनाथ सुलतानपुरी, कार्यकारिणी सदस्य सुरेश नागनूरी, शेखर अगसगी, अनिल पाटील, पुजेरी, विनायक निगानुरे, आर. के. पाटील बसवराज कुल्लोळी, रमेश दम्मनवर, विजय बी पाटील राज्य केपीसीसी विधी विभाग सचिव तौफिक जलील मोमीन, महिला प्रतिनिधी अश्विनी हवालदार व सर्व नूतन पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Tags: