विध्याकाशी धारवाड शहरात खुनांचे सत्र सुरूच असून आज सलग सहाव्या दिवशी हुगार ओणी, कमलापूर येथे एका पाच वर्षीय मतिमंद मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली.
5 वर्षीय सहना हिरेमठ असे खून झालेल्या मतिमंद मुलीचे नाव आहे. मुलीला मानेला दुखापत झाल्याने रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता तिचा मृत्यू झाला. धारदार वस्तूने गळ्यावर वार करून मुलीची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.
दरम्यान, मुलीची आई ज्योती कल्लय्या हिरेमठ आणि तिचा प्रियकर राहुल यांचे अनैतिक संबंध होते.
या अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने सहनाचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे सहनाची आई ज्योतीसह राहुलला उपनगर पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलीस तपासानंतरच या हत्येचे सत्य बाहेर येईल.


Recent Comments