Belagavi

28 फेब्रुवारीपासून बेळवडी मल्लम्मा उत्सव : आ. महांतेश कौजलगी

Share

वीर महिला बेळवडी मल्लम्मा उत्सव दरवर्षीप्रमाणे 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येईल, असे बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले.

बेळवडी गावातील बेळवडी मल्लम्मा स्मारक भवन येथे आज झालेल्या बेळवडी मल्लम्मा उत्सवाच्या प्राथमिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनात गावातील प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे.

बेळवडी मल्लम्माची गाथा पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावी, असे आवाहन सरकारला करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रस्तावही सादर करण्यात आला असून पाठ्यपुस्तकांच्या पुनरावृत्तीवेळी मल्लम्माचा धडा समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आमदार महांतेश कौजलगी यांनी दिले.

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, “बेळवडी मल्लम्मा उत्सव यावेळी मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. आमदारांमुळे यंदाही अधिक अनुदान जाहीर झाले आहे. पूर्वीप्रमाणेच दारुकामाचा कार्यक्रम होईल.” वीरज्योती 26 फेब्रुवारी रोजी वीरवनिता बेळवडी मल्लम्माचे मूळ गाव, उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील सोंडे येथून विरज्योती आणण्यात येईल.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले की, प्रमुख शहरांना भेटी दिल्यानंतर ज्योतीचे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बेळवडीत आगमन होईल.

या बैठकीत जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, उपाध्यक्षा संगीता किनेकर, उपविभागीय अधिकारी प्रभावती फक्कीरापुरा, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, विविध विभागांचे अधिकारी व गावातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

Tags: