Dharwad

धारवाडमध्ये विश्वकर्मा समाजाचे आंदोलन

Share

अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत विश्वकर्मा समाजाचा समावेश करण्याच्या मागणीसाठी धारवाडमध्ये विश्वकर्मा समाजातर्फे आंदोलन छेडण्यात आले.

अखिल कर्नाटक विश्वकर्मा महासभेच्या नेतृत्वाखाली विश्वकर्मा समाजाच्या नेत्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला. विश्वकर्मा समाज हा आधीच खूप मागासलेला समाज आहे. हा समाज शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.

त्यामुळे राज्य सरकारने वंशावळीचा अभ्यास अहवाल त्वरित केंद्राला सादर करावा आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत विश्वकर्मा समाजाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करावा, चालू अर्थसंकल्पात विश्वकर्मा महामंडळासाठी 100 कोटी रौये निधी राखीव ठेवण्याची मागणी आंदोलकांनी केली.  आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला.

Tags: