केएलई संस्थेच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या सहकार्याने सेवक संस्थेतर्फे बेळगावमध्ये डिजिटल सोशल मीडिया कम्युनिकेशनच्या माध्यमातून विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी 3 दिवसीय कार्यशाळा कॉलेजच्या सभागृहात पार पडली.
यावेळी बोलताना डॉ. प्रवीण म्हणाले की, सोशल मीडियाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असून चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.
सर्वसाधारणपणे आपण समोरच्याशी प्रत्यक्ष बोलणे म्हणजे परस्पर संवाद होय. सोशल मीडियावरील संवादाचा विचार केला तर स्वतः प्रत्यक्ष उपस्थित नसताना केलेला शाब्दिक संवाद होतो. सोशल मीडियाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

वरिष्ठ व्याख्याते एन. के. काळे म्हणाले की, गुगल मीट आणि झूम सारखे ॲप अनेक प्रकारे संवादासाठी उपयुक्त आहेत. सोशल नेटवर्क हे समाजासाठी आदर्श ठरले पाहिजे. तरुण पिढीने चांगल्या कामासाठी सोशल नेटवर्कचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
या प्रसंगी सहाना निलजकर, डी. के, कुलकर्णी, ‘सेवक’चे सचिव आनंद लोबो, संचालक जे. एम. मुनवळ्ळी, प्राचार्य व्ही. पी. पुरी, जे. आर. गोलिहाळी, ए. एफ. दोडमनी, डॉ. सुषमा, डी. के. कुलकर्णी, सुजाता, केएसएआर कॉलेज, एमएनआरएसए कॉलेज आणि जीआयटी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments