हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डीजवळील जिनराळ गावात एका विवाहितेसह एका पुरुषाने पळ काढल्याची घटना घडली. त्याचे तीव्र पडसाद उमटून संबंधित पुरुषाच्या घराची तोडफोड महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

जिनराळ गावातील रेणुका वालिकार ही विवाहित महिला तिचा जुना मित्र लगमा वालिकारसोबत पळून गेली. रेणुका यांच्या घरातील 10-12 लोकांनी लगमा यांच्या घरी धाव घेतली असता त्यांना घरात कोणीही नसल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी घराची तोडफोड केली.
बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यमकनमर्डी पोलिसांनी जिनराळ गावात घडलेल्या या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी जाळे विणण्यात आले आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. रेणुका आणि लगमा हे दोघेही विवाहित असून त्यांना दोन मुले असल्याची माहिती मिळाली आहे.


Recent Comments