विध्याकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारवाडमध्ये खुनांचे सत्र सुरूच आहे. आज सलग चौथ्यादिवशी एका एग राईस सेंटरमधील स्वयंपाक्याची वेटरने हत्या केल्याची घटना उघडकीस आली.
एग राईस सेंटरमधील कुकची तेथे काम करणाऱ्या वेटरने हत्या केल्याची घटना धारवाडमध्ये रात्री उशिरा घडली आहे. आज बुधवारी पहाटे खुनाचा हा प्रकार उघडकीस आला.
धारवाडमध्ये चौथ्या दिवशीही खुनाचा प्रकार सुरूच होता. एकामागून एक हत्येच्या बातम्या ऐकून लोकांना धक्काच बसला. फकिरेश प्याटी असे खून झालेल्या कुकचे नाव असून तो शहरातील संगम सर्कलजवळील विमल हॉटेलमध्ये स्वयंपाकी होता. तो मूळचा गदग जिल्ह्यातील शिरहट्टी तालुक्यातील सुगनहळ्ळी येथील रहिवासी आहे. विमल हॉटेलचाच सप्लायर असलेल्या कनेयप्पा याने फकिरेशची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तो मूळचा तामिळनाडूचा आहे. सध्या स्थानिकांच्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली.
तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय धारवाडमध्ये गेल्या पाच दिवसांत चार खुनाच्या घटना घडल्या असून या वृत्ताने नागरिक हादरले आहेत. शेट्टर कॉलनीतील आंबेडकर कॉलनीतील तरुणाच्या चाकूने भोसकून झालेल्या खुनाचा तपास अजूनही सुरूच आहे.


Recent Comments