Chikkodi

येडूर श्री वीरभद्रेश्वर विशाळी जत्रामहोत्सव उद्यापासून : श्रीशैल श्री

Share

चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात 8 ते 10 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस श्री वीरभद्रेश्वर विशाळी जत्रा आणि महारथोत्सव होणार आहे, अशी माहिती श्रीशैल जगद्गुरु चेन्नसिद्धराम पंडितराध्य शिवाचार्य यांनी दिली.

येडूर येथील काडसिद्धेश्वर मठ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन स्वामीजी म्हणाले की, फेब्रु. 8 रोजी सकाळी 9 वाजता श्रीशैल जगद्गुरू यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मींदरगी येथील निळकंठ शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. चिक्कोडीचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. गडेद, सांगली येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमोल भोजे, कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कणिरे, डॉ. पद्मजीत नाडगौडा-पाटील, डॉ. मनीषाताई गुरव, डॉ. राजकुमार हिरेमठ, डॉ.शरण हल्लाडा, डॉ. सुधीर जंबगी आदी तपासणी करणार आहेत.

सायंकाळी 6.30 वाजता धार्मिक जागृती व सांस्कृतिक सोहळ्याचे उदघाटन फलोत्पादन मंत्री एस.एस. मल्लिकार्जुन करणार आहेत. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी अध्यक्षस्थानी असतील. परिवहन आणि धर्मादाय मंत्री रामलिंगारेड्डी ग्रंथ लोकार्पण करतील. मंत्री शिवराज तंगडगी पीडितांना घरे सुपूर्द करणार आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आमदार बसवराज रायरेड्डी आणि सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी प्रमुख पाहुणे असतील, असे त्यांनी सांगितले.

चिक्कोडीचे संपादन मठाचे स्वामीजी, बेलंकीचे शिवलिंग स्वामीजी, बागोजीकोप्पाचे मुरुगेंद्र स्वामीजी, अथणीचे प्रभू चन्नबसवा स्वामीजी, सुनधोळीचे शिवानंद स्वामीजी यांच्या सानिध्यात कार्यक्रम होतील. फेब्रु. 9 रोजी सायंकाळी 7 वाजता धर्म जागृती समारोप व हास्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे उदघाटन भाजप राज्य रयत मोर्चाचे अध्यक्ष ए.एस. पाटील-नडहळ्ळी यांच्या हस्ते होणार असून, केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, जमखंडीचे आमदार जगदीश गुडगुंटीमठ, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, हनुमंतराय पाटील पडगनूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मुरुगोड येथील निळकंठ स्वामीजी, हुक्केरी गुरु शांतेश्वर मठाचे चंद्रशेखर स्वामीजी, मल्लिकार्जुन स्वामीजी, अभिनव पुंडलीक आगा महाराजा, शिवलिंग स्वामीजी, शेगुणसीचे डॉ. महंत प्रभू स्वामीजी हे कार्यभार सांभाळतील. नंतर गंगावती प्रणेश, बसवराज महामणी, नरसिंह जोशी यांचा हास्यकार्यक्रम होईल. फेब्रु. 10 रोजी दुपारी 4 वाजता श्रीशैला जगद्गुरु डॉ. चेन्नासिद्धराम पंडितराध्या शिवाचार्य यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रथोत्सवाचे नेतृत्व चंदरगी हिरेमठचे वीरभद्र शिवाचार्य करणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता हानगल कुमारेश्वर यांच्या जीवनावर आधारित विराटपूरचा वैरागी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सकाळी ७ वाजता सामूहिक अय्याचार व लिंगदीक्षा होणार असल्याचे श्रीशैल श्री यांनी सांगितले.

Tags: