वेगळ्या राष्ट्राच्या मागणीचे विधान करणारे खासदार डी.के. सुरेश यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले.
खासदार डी.के. सुरेश यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने केली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आरटीओ सर्कल येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलक भाजप कार्यकर्त्यांनी खासदार डीके सुरेश यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर लावलेले पोलीस बॅरिकेड ढकलून कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेड ढकलत असताना भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर काहीसा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक भाजप कार्यकर्त्यांना अटक करून पोलिस वाहनात बसवून नेले.

दरम्यान, काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे कार्यकर्ते राजशेखर तळवार आणि मल्लिकार्जुन यांनी भाजपच्या निदर्शनाविरोधात आक्रोश व्यक्त करून मोदी, अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनावेळी आमचे नेते उपस्थित नसताना काँग्रेस नेत्यांनी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत आमचे नेते केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. कर्नाटकचे जीएसटी कराचे पैसे परत आले पाहिजेत, असा संताप व्यक्त केला.


Recent Comments