Belagavi

बेळगावात भारतीय कृषक समाजाचे आंदोलन

Share

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी पूरक अर्थसंकल्प मांडावा, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजातर्फे बेळगावात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडावा, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजाच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते सिद्धप्पा मोदगी म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळ आहे. शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. सरकारने दिलेल्या भरपाईला काहीच किंमत नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना बँकांच्या जाचातून वाचवण्यासाठी ‘शेतकरी कर्जमुक्ती आयोग’ गठीत करून कोणत्या वर्षी पीक वाया गेले, याचा अंदाज अर्थसंकल्पात मांडण्यात यावा. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा लागू करावा, असे ते म्हणाले.
यावेळी भारतीय कृषक समाजाच्या पदाधिकारी व सदस्यांनी आंदोलनात भाग घेतला.

Tags: