Hukkeri

शशिकांत नाईक वेगळ्या पद्धतीने समाजकार्य करत आहेत – सतीश जारकीहोळी

Share

सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, माजी मंत्री शशिकांत नाईक हुक्केरी तालुक्यात विविध मार्गाने सामाजिक कार्य करत आहेत.

हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात दिवंगत उमाताई नाईक यांच्या 6व्या स्मरणार्थ भारतीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान आयोजित वाणी व श्रवणदोष रुग्णांसाठी तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत रिबन कापून करण्यात आले.

माजी मंत्री शशिकात नाईक म्हणाले कि आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हैसूर येथील मानस गंगोत्री रुग्णालयाचे डॉक्टर व शेकडो कर्मचारी हुक्केरी तालुक्यातील श्रवण व वाणीच्या समस्या असलेल्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करून योग्य ते उपचार देत आहेत.
नंतर झालेल्या कार्यक्रमात मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात परंतु शशिकांत नाईक विविध प्रकारच्या श्रवण व वाणी दोष असलेल्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यासाठी शिबिर आयोजित करून , समाजसेवा करत आहेत हे कौतुकास्पद आहे.

व्यासपीठावर माजी आमदार ए.बी.पाटील, एस.बी.घाटगे, तहसीलदार मंजुळा नाईक, शिवकुमार नाईक, संजीव बानी, बसगौडा पाटील, अमरनाथ महाजन शेट्टी, सुभाष नाईक, आशिया मोकाशी आदी उपस्थित होते. त्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांची तपासणी करून योग्य ते उपचार दिले. ऑल इंडिया स्पीच अँड हिअरिंग इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.एम. पुष्पावती यांनी सांगितले की, ज्या रुग्णांची श्रवणशक्ती आणि वाणी कमी झाली आहे, त्यांची आमच्या संस्थेमार्फत मोफत तपासणी केली जाईल आणि गरज भासल्यास होसूरचे भारतीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान 60 टक्के पैसे देऊन , साधने उपलब्ध करून देईल .

यावेळी एल.के.लक्कन्नवर, भीमप्पा रामगोनट्टी, महंतेश मगदुम्म, सदानंद कराळे, एल.सी.कोटबागी, एस.जी.बडिगेर आदी नेते उपस्थित होते व शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Tags: