नमाज अदा करण्यासाठी एसएसएलसी परीक्षेच्या वेळा बदलल्याबद्दल श्री रामसेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
प्रमोद मुतालिक यांनी सोमवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. 26 ते 2 मार्च दरम्यान होणाऱ्या एसएसएलसी परीक्षेची वेळ सकाळी 10.30 वाजता निश्चित करण्यात आली आहे. पण मार्च 1 रोजी शुक्रवार आहे. त्यादिवशी परीक्षेची वेळ दुपारी 2 वाजल्यापासून ठेवण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेस सरकार नमाज अदा करण्यासाठी परीक्षेच्या वेळेत बदल करून शिक्षणात धर्म आणत असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस सरकारने परीक्षेदरम्यान हिजाब घालण्याची परवानगी होती. मात्र परीक्षा देणाऱ्या हिंदू महिला, मुलींची मंगळसूत्र आणि जोडवी काढणारे नीच तुम्ही आहात. तुम्ही मुस्लिम समाजाला 10 हजार कोटी देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही करसेवकांची जुनी प्रकरणे उघडली आहेत. यातून टिपू सुलतान, औरंगजेब आणि बाबर यांची राजवट पुन्हा सुरू झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.


Recent Comments