Belagavi

केंद्राविरोधात उद्या नवी दिल्लीत काँग्रेसची निदर्शने : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

आपला पुत्र मृणाल हेब्बाळकर बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडूक लढविण्याची चर्चा असली तरी, त्यांना तिकीट देणे न देणे हे पक्ष हायकांडवर अवलंबून आहे असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बालर म्हणाल्या की, संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील 11 आमदार, दोन विधान परिषद सदस्य, 135 आमदार, राज्यसभा सदस्य आणि लोकसभा सदस्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत लोकसभेसमोर उद्या आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारकडून राज्याला निधी, कर परतावा देण्यात होणाऱ्या भेदभावाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, मृणाल हेब्बाळकरही बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना तिकीट द्यायचे की नाही हे हायकमांडवर अवलंबून आहे. लोकांना मृणाल हवे आहेत. मात्र हायकमांडचा निर्णय अंतिम आहे.

लक्ष्मण सवदी यांना काँग्रेसमध्ये आणण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपमध्ये ज्या पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली त्यामुळे ते आमच्या पक्षात आले आहेत. ते कोणत्याही कारणास्तव काँग्रेस सोडणार नाही, असा विश्वास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

Tags: