Banglore

राज्याला न्याय देण्यात भाजप नेते अपयशी; त्यांनी करावे आत्मपरीक्षण : डीकेशी

Share

सिद्धरामय्या कुंकूही लावत नाहीत असे कोण म्हणाले? परवाच तर त्यांनी कुंकू लावला होता. महिलांप्रमाणे रुंद कुंकू लावणे शक्य आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला.

कलबुर्गी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना डी.के. शिवकुमार म्हणाले की, मला सुगंधी फुलांची ऍलर्जी आहे. त्याचप्रमाणे, इतर लोकांना वेगवेगळ्या ऍलर्जी असू शकतील. सिद्धरामय्या कुंकूही लावत नाहीत असे कोण म्हणाले? परवाच तर त्यांनी कुंकू लावला होता. महिलांप्रमाणे रुंद कुंकू लावणे शक्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

राज्याला न्याय देण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप नेत्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. त्यांनी एक दिवसही पंतप्रधानांची भेट घेतली नाही आणि राज्याच्या हितासाठी आवाजही उठवला नाही. आधी केंद्रावर दबाव आणा आणि राज्यावर झालेला अन्याय दुरुस्त करा. तुमच्या अशा वागण्यामुळेच राज्यातील जनतेने तुमचा तिरस्कार केला आहे, असा टोलाही डीकेशी यांनी लगावला.

फेब्रुवारी 7 रोजी भाजप नेत्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दुष्काळात केंद्र सरकारने राज्याला दिलासा दिला नाही, अर्थसंकल्पात राज्यावर झालेला अन्याय, २०१४ मध्ये जाहीर केलेले अनुदान न वाटणे या मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या विरोधात 7 फेब्रुवारी रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री, आमदार, खासदारांनी पहिल्यांदाच असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

Tags: