Dharwad

तडकोड दंगल : कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पीएसआय निलंबित

Share

धारवाड तालुक्यातील तडकोड गावात झालेल्या जातीय दंगल प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यावरून गरग ठाण्याचे पीएसआय डी. प्रकाश यांना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गोपाल ब्याकोड यांनी जारी केला आहे.

तडकोड गावातील सद्दामहुसेन नावाच्या तरुणाने एक फोटो एडिट करून अयोध्या राममंदिरावर हिरवा झेंडा फडकतानाचा व ओवेसीचा फोटो स्टेटसला ठेवला होता, त्यावर ‘ही पॉवर आहे’ असा मजकूर लिहिला होता. याप्रकरणी गरग पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. नंतर याच मुद्द्यावर हिंदू कार्यकर्ते आक्रमक होत सद्दाम हुसेनच्या घरासमोर जमले.

गावात प्रतिकूल वातावरण असतानाही योग्य बंदोबस्त न राखता कर्तव्यात कसूर केल्याबद्दल धारवाडचे एसपी गोपाल ब्याकोड यांनी गरग पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रकाश यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: