राजधानी बेंगळूरमध्ये आज बर्निंग मोटारसायकलचा थरार पहायला मिळाला. धावत्या दुचाकीला अचानक आग लागली. ही घटना बेंगळुर येथील इलेक्ट्रॉनिक सिटीजवळ घडली.
धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना आज बेंगळुर येथील इलेक्ट्रॉनिक सिटीजवळ घडली. बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटीजवळ देवाच्या डिओ बाईकला शॉर्टसर्किटने आग लागली आणि बाइकने पेट घेतला. दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून बाईक सोडून बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. आग दिसू लागताच दुचाकीस्वार पटकन उतरून बाजूला थांबला. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक सिटी वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments