माणसाचे कर्तृत्व शाश्वत असले पाहिजे. असे ऍड . रामचंद्र जोशी म्हणाले .

हुक्केरी शहरात दिवंगत रवींद्र शेट्टी यांच्या चौथ्या स्मृतिदिनाचा एक भाग म्हणून सी आर शेट्टी फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी, उपचार आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन घोडगेरी येथील मल्लय्या महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत दिवंगत रवींद्र यांच्या प्रतिमेला पूजन करून त्यांनी केले. शेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

व्यासपीठावर डॉ.इंद्रजीत शिंदे, नीलांबिका शेट्टी, पिंटू शेट्टी, अधिवक्ता रामचंद्र जोशी, प्राचार्य सर्वमंगला कमतगी, गोकाक रक्तपेढीचे सुरज दिवसे, अनिल शेट्टी आदी उपस्थित होते.
पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक राघवेंद्र कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी ऍड . रामचंद्र जोशी म्हणाले की, दिवंगत रवींद्र शेट्टी यांच्या प्रेरणेने त्यांची मुले पिंटू शेट्टी आणि अनिल शेट्टी हे गरीब प्रतिभावंतांसाठी सीआर शेट्टी फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्याना सहायय करीत आहेत . रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, उपचार, नेत्रदान आणि मोफत शिक्षण अशी सामाजिक कार्य करून आदर्श बनले आहेत.

यावेळी सी एस तुबची शैक्षणिक संस्था, एस के पब्लिक इन्स्टिट्यूशन आणि सी आर शेट्टी फाउंडेशनचे मंडळ सदस्य, शेट्टी कुटुंबीय आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments