Belagavi

बेळगावात रामनगर वड्डरवाडी दुर्गादेवी यात्रेला प्रारंभ

Share

दर पाच वर्षांनी भरणाऱ्या बेळगावच्या वड्डरवाडी श्री दुर्गादेवीच्या यात्रेला मंगळवारी भव्य मिरवणुकीने प्रारंभ करण्यात आला.

बेळगावातील वड्डरवाडीच्या प्रसिद्ध श्रीदुर्गादेवीचा जत्राही आजपासून ५ दिवस चालणार आहे. यानिमित्त स्ज, मंगळवारी सकाळी संगोळी रायण्णा सर्कल येथून दुर्गादेवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध मार्गांवर फिरून रामनगर वड्डरवाडी दुर्गादेवी मंदिरापर्यंत ही भव्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात युवकांनी नृत्य केले.

वड्डरवाडी श्री दुर्गादेवी जत्रेबाबत इन न्यूजला माहिती देताना मंदिर ट्रस्ट कमिटी सदस्य हनुमंत कागलकर म्हणाले की, दर ५ वर्षांनी रामनगर वड्डरवाडी येथे श्री दुर्गादेवीची जत्रा भरते. आज यानिमित्त देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. ही यात्रा आजपासून बुधवार दि. ७ फेब्रुवारीपर्यंत भरणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सिद्धरामेश्वर मंदिराच्या प्रांगणात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, उद्या देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. दुपारी १२ तर ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी देवीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, चंडिका होम, मंगळवार दि. ७ रोजी हनुमान मंदिरात महारुद्र, होमहवन पूजेचे आयोजन केले आहे.

या मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रमात रामनगर, वड्डरवाडी पहिली, दुसरी व तिसऱ्या गल्लीची पंच मंडळी, श्री दुर्गादेवी देवस्थान यात्रा महोत्सव कमिटी, श्री दुर्गामाता युवक मंडळ, आंबेडकर क्रांती युवा वेदिकेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: