Belagavi

… अरेरे, मद्यप्रेमी हळहळले!, बेळगावात तब्बल 89 लाख 60 हजार किमतीची दारू नष्ट

Share

विविध अवैध दारू वाहतूक आणि विक्री प्रकरणात जप्त केलेली तब्बल 89 लाख 60 हजार रुपयांची विविध बनावटीची दारू बेळगाव जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज नष्ट केली. कणबर्गीजवळील मैदानात जेसीबी लावून ही दारू नष्ट करण्यात आली.

बेळगावजवळील कणबर्गी रामतीर्थ नगराच्या हद्दीत अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून दारू नष्ट केली. अवैध दारू वाहतूक आणि विक्री, गोवा दारू, बनावट दारू विक्री अशा एकूण 101 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली सर्व दारू नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. फ्लो
एकूण 101 गुन्ह्यात दारू जप्त करण्यात आलेली बेकायदेशीर व बनावट गोवा डिस्टिलरी, बिअर आदी 89 लाख 60 हजार किमतीची ब्रँडेड दारू नष्ट करण्यात आली. यात 18,297 लीटर दारू, 4,061 लीटर बिअर, तस्करी मद्य 665 लीटर दारू अशा एकूण 89 लाख 60 हजार किमतीच्या दारूचा समावेश आहे. मद्यप्रेमींसाठी हे हृदयद्रावक दृश्य आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम. यांनी सांगितले की, बेळगावजवळील रामतीर्थ नगराच्या हद्दीत अवैध आणि बनावट गोवा दारू, बीअर आणि ब्रँडेड दारू नष्ट करण्यात आली आहे. बेकायदेशीर दारूचे सेवन करण्यापासून लोकांना रोखणे हा आमच्या विभागाचा मुख्य उद्देश आहे. .

यावेळी अबकारी अधिकारी उपस्थित होते.

Tags: