बेळगावचे ज्येष्ठ धावपटू सुरेश देवरमणी यांचा प्रजासत्ताक दिनी बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत अनेक पदके पटकावून बेळगावचा लौकिक वाढवलेले ७२ वर्षीय धावपटू सुरेश लक्ष्मणराव देवरमणी यांचा प्रजासत्ताक दिनी बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध खेळाडू आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सुरेश देवरमणी यांचा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते म्हैसुरी फेटा, शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


Recent Comments