Belagavi

उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांची वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी

Share

बेळगावच्या उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या चोरीच्या घटनांनी कंटाळून गेलेल्या उद्योजकांनी उद्यमबाग पोलीस

स्थानक तसेच पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांची भेट घेऊन उद्यमबागमधील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्याची विनंती केली .
व्हॉइस ओव्हर :बेळगावच्या

उद्यमबाग परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . यामुळे त्रासून गेलेल्या
उद्योजकांनी उद्यमबाग पोलीस स्थानकाला भेट देऊन , आपली कैफियत मांडली .

तसेच बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांची भेट देऊन उद्यमबागमधील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्याची विनंती केली . यावेळी आयुक्त सिद्रामपा यांनी लवकरात लवकर चोरांच्या टोळीला गजाआड करू असे आश्वासन दिले .

यावेळी उद्यमबाग येथील उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते .

Tags: