Belagavi

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीतर्फे प्रजासत्ताक दिनी स्केटिंग रॅली

Share

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक वर प्रजासत्ताक दिनी स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये 4 ते 16 वयोगटातील सुमारे 50 स्केटर सहभागी झाले होते.

एकूण 2 किमी अंतर पूर्ण करत प्रजासत्ताक दिनाची ही रॅली “भारत माता की जय आणि वंदे मातरम्” अशा घोषणा देत पूर्ण करण्यात आली. या रॅलीचे उदघाटन गणेश दडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, विशाल वेसने तसेच बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीचे पालक व स्केटर्स उपस्थित होते.

Tags: