Belagavi

नंदिहळ्ळी येथे खा. इरण्णा कडाडी यांच्याहस्ते समुदाय भवनाचे भूमिपूजन

Share

बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी येथे खा. इरण्णा कडाडी यांच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या समुदाय भवनाचे भूमिपूजन यांच्याहस्ते समारंभपूर्वक पार पडले.

बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नंदिहळ्ळी गावामध्ये राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी यांनी विठ्ठल-बिरदेव मंदिर आवारामध्ये समुदाय भवन बांधण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. या भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी बोलताना इरण्णा कडाडी म्हणाले की, मी राज्यसभा सदस्य असल्याने संपूर्ण राज्यांमध्ये आमच्याकडून अनुदानासाठी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. पण ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे आमदार नाहीत अशा ठिकाणी जास्त अनुदान देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. याचा सदुपयोग जनतेने करून घ्यावा, अगदी कमी वेळामध्ये बांधकाम पूर्ण करून उद्घाटन व्हावे व जनतेला त्याचा उपयोग व्हावा याची खबरदारी गावातल्या जनतेने घ्यावी असे ते म्हणाले.

प्रारंभी वाद्यांचा गजरात राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांना मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी नेण्यात आले. याप्रसंगी ‘मन की बात’ हा पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या ऐकण्यात आला. याप्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, देसुर महाशक्ती केंद्रप्रमुख मारुती लोकूर, मंडळ सरचिटणीस बसवराज धमनगी, मंडळ चिटणीस चेतन अंगडी, मंडळ भाजप कार्यालय कार्यदर्शी नारायण पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, संतोष अंगडी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: