बेळगावातील गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील पाचपैकी दोन गंभीर जखमींचा रविवारी रात्री मृत्यू झाला. या दुर्घटनेतील अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
बसवाण गल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये रविवारी दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एकूण पाचजण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मूळचे उडुपी येथील कामाक्षी भट्ट (वय ८०) आणि हेमंत भट्ट (वय २७) यांचा केएलई इस्पितळात उपचारांवेळी मृत्यू झाला. अन्य तीन जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बसवाण गल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये हे कुटुंब राहत होते. रविवारी दुपारी गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते.
स्थानिकांनी आणि पोलिसांनी सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments