Belagavi

धावपळीच्या जगात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ द्या : शैलेंद्रसिंग शेखावत

Share

धावपळीच्या जगात माणूस स्वतःच्या आरोग्यासाठी बिलकुल वेळ देत नसल्याने प्रत्येकाला काही ना काही समस्या निर्माण होत आहेत. त्यासाठी स्वतःसाठी वेळ देऊन रोजची जीवनशैली बदलणे गरजेचे असल्याचे मत जयपूर राजस्थान येथून आलेले पोषण आरोग्य तज्ञ शैलेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केले.

बेळगावातील आदर्शनगर, वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये झालेल्या आरोग्यविषयक व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रतिभा राठोड आणि सीईओ मदन बामणे होते.

पुढे बोलताना शैलेंद्रसिंग यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत नियमित व्यायाम करणे, रोज तीन वेळा आहार तो ही वेळेत घेणे, लवकर झोपून, लवकर उठणे आणि भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घेणे महत्त्वाचे असल्याचे अत्यंत खुमासदार शैलीत सांगितले. बाईट
फौंडेशनच्या संस्थापिका डॉ सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात, संजीवीनी फौंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवित असताना यावर्षी आरोग्यविषयक व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. उपस्थितांचे स्वागत जयश्री ढवळी यांनी केले. सीईओ मदन बामणे यांच्याहस्ते शैलेंद्रसिंग शेखावत यांचा तर सल्लागार डॉ सुरेखा पोटे यांच्याहस्ते प्रतिभा राठोड यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थितांची उंची, वजन, शारीरिक क्षमता, शरीरातील चरबीचे प्रमाण, शरीराचे वय, त्वचेखालील चरबी, बॉडी मास इंडेक्सची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणी केलेल्या अनेक उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून समाधानकारक माहिती प्रतिभा राठोड यांनी दिली.
ही तपासणी करण्यासाठी प्रियांका राठोड, अजितसिंग शेखावत यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सिद्दी यानी केले. शिल्पा यांनी आभार मानले.

Tags: