मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य व्यक्तींना मतदान करून सुरक्षित लोकशाही राष्ट्राच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी केले.
बेळगावातील केएलएस संस्थेच्या राजा लखमगौडा विधी महाविद्यालयातर्फे आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित मतदान जागृती फेरीला प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी चालना दिली. महाविद्यालयाच्या कायदा जागृती विभागाचे प्रमुख टी. एम. चेतनकुमार म्हणाले की, मतदान हा आपला हक्क आहे आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आरोग्य आणि शिक्षणासह सर्व क्षेत्रे सुरक्षित पायावर आहेत याची खात्री करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने आमिषाला बळी न पडत मतदान करावे.
व्याख्याते प्रा. शिल्पा रायकर यांनी विद्यार्थ्यांना सक्तीने मतदान करण्याची शपथ दिली. मतदान जनजागृती फेरी केएलएस सोसायटीच्या राजा लखम गौडा विधी महाविद्यालयापासून सर्वोदय रोड, आदर्शनगर, हिंदवाडीसह प्रमुख रस्त्यांवरून निघून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारात समाप्त झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर विविध पोस्टर्स व पथनाट्य सादर केले. कायदा जागृती विभागाच्या समन्वयक प्रीतम रेवणकर, स्नेहा बेनाळकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments