लोकप्रिय कन्नड अभिनेता विनय राजकुमार, दिग्दर्शक सिंपल सनी, निर्माते म्हैसूर रमेश आणि “ओंदू सरळ प्रेमकथे” च्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महेश फाऊंडेशनला अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान महेश फाऊंडेशनच्या मुलांनी अभिनेता विनय राजकुमार व पाहुण्यांचे फुलांचे गुच्छ देऊन स्वागत केले. चित्रपटाच्या टीमने संस्थेच्या विविध कार्यांची माहिती घेतली आणि समाजसेवेत सहभागी असलेल्यांचे कौतुक केले. तसेच चित्रपटाच्या टीमने संस्थेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मुलांसोबत आपला अमूल्य वेळ घालवून त्यांना प्रोत्साहन दिले.
अभिनेता विनय राजकुमार म्हणाले, “महेश फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे आणि मला महेश फाऊंडेशनला भेट देऊन आनंद झाला आहे. एवढे मोठे काम केल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. प्रत्येक मुलामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे टॅलेंट हे असतेचं. ते टॅलेंट जोपासल्याने ही मुले भविष्यात काहीतरी मोठे कार्य करू शकतात असे सांगून मुलांना प्रोत्साहित केले.
तसेच “ओंदू सरळ प्रेमकथे” चे दिग्दर्शक सिम्पल सनी म्हणाले, “सिनेमा हे केवळ मनोरंजनच नाही, तर समाजातील समस्यांबद्दल लोकांना सावध करण्याची ताकदही त्यात आहे. तुम्ही यश मिळवणारे आहात, आम्ही नाही. महेश फाउंडेशनचे कर्तृत्व खूप मोठे आहे. इथे तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग घडत आहे. हे सर्व पाहून खूप आनंद झाला. तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या वातावरणात आहात, तुम्ही इथल्या सुविधांचा उपयोग करून घ्या आणि तुम्ही यशस्वी व्हा.” असा सल्ला दिग्दर्शक सिम्पल सनी यांनी दिला.

“ओंदू सरळ प्रेमकथा” सिनेमाचे निर्माते म्हैसूर रमेश म्हणाले, “महेश फाऊंडेशनची कामे प्रेरणादायी आहेत आणि अशा कामांसाठी आम्ही चित्रपटसृष्टीकडून शक्य ती मदत करण्यास तयार आहोत.” महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव यांनी चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. “महेश फाउंडेशन गेल्या १५ वर्षांपासून वंचित मुलांसाठी काम करत आहे. आम्ही मुलांना येथे सर्व सुविधा मोफत देत आहोत. पण १५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. या मुलांवर भेदभावाचा कलंक होता. त्याकाळात अनेकांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने आम्ही या टप्प्यावर पोहोचलो. शिवराजकुमारसर यांनीहि आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे. उदार मनाच्या, समाजाप्रती असलेल्या शिवराजकुमार यांना महेश फाऊंडेशनला भेट दिली आणि मुलांसोबत आपल मौल्यवान वेळ घालवला. त्यांच्या या भेटीमुळे आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले,” असे महेश जाधव यांनी सांगितले.

महेश फाऊंडेशनने अभिनेता विनय राजकुमार, दिग्दर्शक सिंपलसनी, निर्माता म्हैसूर रमेश यांचे त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार केला आणि “ओंदू सरळ प्रेमकथे” हा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महेश फाउंडेशनची मुले, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवकदेखील उपस्थित होते व त्यांनीहि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.


Recent Comments