Belagavi

लिंगायतच लिंगायतांचे विरोधक : डॉ. एस. एम. जामदार

Share

कर्नाटकात आजपर्यंत लिंगायत मुख्यमंत्री हेच लिंगायत धर्माचे विरोधक ठरले आहेत, असे लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. एस. एम. जामदार यांनी सांगितले.

जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने बेळगावात दोन दिवस प्रथम राष्ट्रीय महिला अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. लिंगायत महिला अधिवेशनानिमित्त श्रीनगर उद्यानापासून शोभायात्रा काढण्यात आली. विविध मार्गांवर फिरून ती शिवबसव नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकमध्ये पोहोचली

जागतिक लिंगायत महासभेच्या पहिल्या महिला अधिवेशनाचे उदघाटन गदग येथील तोंटदार्य डंबळ मठाचे श्री सिद्धराम महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शिवशरण सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.  अधिवेशनाला संबोधित करताना लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. एस. एम. जामदार महाले की, स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी लिंगायत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत, केंद्राने 1963 मध्ये शीख धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली. बौद्ध धर्माच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घेतला. 1890 मध्ये म्हैसूरच्या महाराजांनी लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा आदेश दिला, देशातील पहिली बसव जयंतीची सुट्टी महाराष्ट्र सरकारने 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात जाहीर केली.

त्यानंतर कर्नाटकात तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी बसव जयंतीची सुट्टी जाहीर केली. लिंगायत मुख्यमंत्री हेच स्वतंत्र लिंगायत धर्माचे विरोधक ठरले आहेत. इतर समुदायाच्या मुख्यमंत्र्यांनी लिंगायतांच्या बाजूने काम केले. सिद्धरामय्या 2013 मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी कार्यालयात बसवण्णांचा फोटो लावणे अनिवार्य केले, अक्कमहादेवी विद्यापीठाची स्थापना केली होती. लिंगायत नसलेल्या नेत्यांनी कोणतेही लिंगायत विरोधी काम केलेले नाही.

पण लिंगायत मुख्यमंत्री फक्त व्होट बँकेचे राजकारण करत आहेत, अशा शब्दात जामदार यांनी संताप व्यक्त केला. पूर्वी स्वतंत्र धर्माच्या नावाखाली समाजात फूट पडेल, अशी भीती होती. वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळ्या गोष्टी करणार होते. तेव्हा कोणत्याही कारणास्तव समाजात फूट पडू देणार नाही, असा निर्धार महासभेने केला होता. त्यामुळे आज समाज एकवटला आहे, असे लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. एस. एम. जामदार म्हणाले.  शिवानंद स्वामीजी म्हणाले की, वीरशैव धर्म हा प्राचीन धर्म असून जागतिक लिंगायत अधिवेशन घेऊन लिंगायत धर्माचे मूल्य वाढविण्याचे काम करत आहोत, जगात महिलांचा सन्मान करणारा धर्म लिंगायत धर्म आहे.

यावेळी व्यासपीठावर गदगचे टोंटदार्य सिद्धराम महास्वामी, अधिवेशनाच्या अध्यक्षा कुडलसंगम बसव धर्मपीठाच्या जगद्गुरू गंगामाताजी, शिवानंद महास्वामी, मुरुगेंद्र स्वामी, अक्का अन्नपूर्णा माते, शरणंबिका माते, लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांच्यासह अनेक मठाधीश उपस्थित होते.

Tags: