Athani

वायव्य परिवहन महामंडळातील त्रुटी दूर करण्याचा करणार प्रामाणिक प्रयत्न

Share

सरकारने 32 महामंडळांसाठी ज्येष्ठ आमदारांची निवड केली आहे. प्रत्येकाला मंत्री बनवणे शक्य नसल्याने महामंडळ अध्यक्षपद देऊन त्यांना सन्मान दिला आहे. असे आ . राजू कागे म्हणाले .

मला वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले असून तेथील त्रुटी दूर करण्याचा प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्न करेन. परिवहनच्या बसेसची कमतरता, रस्ते, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे काम मी करणार आहे.

तोट्यात चाललेल्या महामंडळाला नफ्याच्या उच्च पातळीवर आणण्यासाठी मी काम करणार आहे. प्रत्येकाने किफायतशीर पद मागितले तर लोकांना आमची माहिती येणार नाही, त्यांना मूलभूत सुविधा पुरवणे हे आमदारांचे कर्तव्य आहे, असे आ . राजू कागे म्हणाले.

Tags: